Shivajirao Bhukele
प्रा. शिवाजीराव भुकेले
( संत साहित्याचे अभ्यासक व महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते )
एम. ए. एम फील, हिंदी विभाग प्रमुख, डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे गेली 31 वर्ष अध्यापन कार्य, मूळ गाव- श्रीक्षेत्र पैठण, जि. औरंगाबाद.
◆महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक गोवा राज्यातसंत साहित्य तसेच इतर सामाजिक विषयांवर आज अखेर 5375 व्याख्याने व प्रवचने.
◆ई टीव्ही मराठी, साम टीव्ही, abp माझा इत्यादी वाहिन्यांवर इंद्रायणी काठी, पंढरीची माऊली, आनंदाचे डोही इ. कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण.
◆ई टीव्ही मराठीवरील दर्शन मालिकेत तुका झालासे कळस या विषयावर १०० भागांचे प्रसारण.
◆दैनिक महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, लोकमत, पुढारी, पुण्यनगरी या महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकातून संत साहित्य तसेच इतर सामाजिक आणि प्रासंगिक विषयांवर 1500 हुन अधिक लेखांचे लिखाण.
◆किल्लारी, सास्तुर भूकंप ग्रस्तांसाठी भरीव आर्थिक निधीतून मदत व कोल्हापूर जिल्हयातील महापूर ग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक साहित्याचे वाटप.
◆तुका झालासे कळस, प्रबोधन यात्री संत एकनाथ, बिनधास्त बोला या पुस्तकांचे लिखाण व प्रकाशन.
◆गेली 30 वर्ष डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने ज्यात्या वर्षी गाजलेल्या विषयावर महाराष्ट्रातील 1000 विद्यार्थ्यांकडून विचार मंथन.
◆छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन.
◆प्रबोधन पुरस्कार, सानेगुरुजी पुरस्कार, रोहिदास रत्न पुरस्कार, राजश्री शाहू पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कर, अ. बा. नाईक पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, असे राज्य पातळीवरील 27 पुरस्कराने सन्मान.