एक दिवसीय सेवा इन कोविड कार्यशाळा

    29-Jun-2021
Total Views |

 

सेवासहयोगच्या एकदिवसीय सेवा इन कोविड कार्यशाळेचे 
उदघाटन २६ जुन २०२१ रोजी सकाळी १० वाजता झाले. 
या कार्यशाळेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे प्रमुख  
डॉ धनंजय केळकर आणि डॉ हेडगेवार रुग्णालय,
औरंगाबादचे प्रमुख डॉ अनंत पंढरे उपस्थित होते.


दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सेवा सहयोगचे कार्यकर्ते विनीत कोंडेजकर ह्यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. डॉ केळकर आणि डॉ पंढरे ह्यांची ओळख करून दिल्यावर दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

 

डॉ केळकर ह्यांनी म्हटलेकीभारतात कोविड येणार नाही हा भाबडा आशावाद सुरवातीस होतापणह्या दोन्ही लाटांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आणि भारतात त्यावर उत्तम काम झाले आहे. तिसरी लाट अनेक देशात आली आहे, ती भारतातहीयेऊशकतेपरंतु अतिशय सौम्य स्वरुपात असेल. पुण्यात ४२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचे महत्वसांगताना त्यांनी सांगितले दीनानाथ मधील ४५०० कर्मचार्यांना लस दिली गेली त्यातील फक्त ४० जणांना कोविड झाला आणि तोही सौम्यउपचारांनी बरा झाला.

 

सध्याचा विचार करता vulnerable गटाचा विचार करावा लागेल जसेज्यांनी लस घेतली नाही आणि कोविडही झाला नाही. डॉकेळकरांनी सांगितले की Hope for the best but prepare for the worst, अतिशयवाईट परिस्थितीचा विचार करून पण तरीही न घाबरता काम करणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Imposed आणि Government Imposed अशा दोन्ही सुरक्षा पाळाव्यात. लोकांनी बेगुमानपणे बाहेरपडूनये.

 

सामाजिकसंस्थानी flexible – लवचिक असणे गरजेचे आहे. लवचिकता ह्या अर्थाने कि मनुष्यबळाचा वापर कुठे, कधी, कसा करावाहे समजणे.

 

तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे औषधाचा उपयोग योग्य आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. स्वतःची तब्येत सांभाळणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, ड-जीवनसत्वाचा वापर करणे, ४० मिनिटाचा व्यायाम रोज करणे अशाछोट्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे.

 

सेवा इन कोविड मध्ये दुसरे उदघाटक वक्ते होते डॉ अनंत पंढरे. त्यांच्या सामाजिक कामाचा अनुभव सांगत त्यांनी जनतेची मानसिकता कशी जपावी ह्यावर मार्गदर्शन केले. समाजामध्ये जेव्हा न भूतो न भविष्याती अशी परिस्थिती निर्माण होते आणि समाज ढवळून निघतो त्यावेळेस समाजाने समनव्याने काम कसे करावे आणि बदल कसे  घडवावेत  ह्याचे  मार्गदर्शन  केले.

 

एक प्रसंग त्यांनी सांगितला. दिल्लीला ज्यावेळेस चीन वरून विमान आले होते तेव्हा बरेच लोक मास्क लावून बाजूला उभे होते, तेव्हा डॉ केळकरांनी सांगितले तसे आपला भाबडा विश्वास होता किहे काय आहे, भारतात ह्या प्रकारचे आजार होणार नाहीत. पण नंतर आपल्यात जागरूकता आली आणि आपण ह्या दोन्ही लाटांचा सामना अतिशय योग्य पद्धतीने केला. ह्यामध्ये वैद्यकीय सक्षमीकरण दिसले. सामजिक काम करताना तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांनी सुद्धा लवचिकता बाळगणे आवश्यक आहे. भारतामध्ये लोकसंख्येच्या मानाने कमी प्रमाण मृत्यूचे दिसले.

 
 

त्रिसूत्री पाळणे जसे मास्क, अंतर पाळणे, योग्य डॉक्टर सल्ला हेच पाळणे गरजेचे आहे. आज इथे खूप गावपातळीवर लोक आलेले आहेत. अशा गाव पातळीवर काम करणाऱ्या सामजिक कार्यकर्त्यांना असा सल्ला दिला कि पुणे मुंबई मध्ये अनेक तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत होती. ती बदल, उपचारअशा विषयांवर रोज तौलानिक अभ्यास करत असत त्यामुळे त्यातील औषधोपचार आणि कोरोनाच्या साथीतील बदल त्यावर उपचार असे अभ्यास होत होता. गावातील कार्यकाइत्यानी छोटे गटकरून शहरातील एखाद्या अभ्यास गटाशी सलग्न राहावे. त्यातून मदत घ्यायचा प्रयत्न करावा. तसेच संघशक्ती अशा आपत्ती मध्ये चांगले काम करते. प्रत्येकानं आधी स्वतःच्या हातात असलेली गोष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे मास्क, अंतर पाळणे आणि जिथे शक्य असेल तिथे ह्या बद्दल जन जागृती करणे आपल्या शेजारी, सोसायटी मध्ये माहिती सांगता राहणे हे आवश्यक आहे.

 

डॉ धनंजय केळकर आणि डॉ अनंत पंढरे ह्यांनी सेवा ईन कोविड ह्या कार्यशाळेचे उदघाटन केले. ह्या कार्यशाळेत अनेक विषयावर मार्गदर्शन होणार आहे. एकंदरीत११ सत्रे उदघाटन आणि समारोप असे धरून आहेत.

 

कोविड नंतरची काळजी, लहान मुले आणि कोविड, कोविड केयरसेंटर उभारणी,डॉक्टर प्रशिक्षण, नियोजन, पूर्वतयारी,लसीकरण व कोविड साठी वैद्यकीय चाचण्या,यशोगाथा, CSR ह्याविषयी मार्गदर्शन आहे.